हरवला श्वास माझा
हरवला श्वास माझा
भान हरवते निशा कशी
विसावते क्षणी रात्र अशी
भुरळ पडते मनी कुणाची
भेटते नजर तुझ्यशी जशी
श्वास हरवता माझा असा
खुणवता तू मलाच जसा
एकांती जागते भाव कुणी
वागते मन विरहाचा पसा
भाग्य हसवते क्षणास जसे
रडवते तेच मनी प्रिय असे
अभासी जगते श्वास कुणी
मागते उगा शब्दीक हसे
मन:पटलावर उमटते ही
समेटते विखुरले जे काही
किती चालते सांभाळूनी
पाळते वेदनेच्या नितिसही
श्वास हरवला माझा होता
भारवला तू उगाच नव्हता
नयनी भावते चित्रवत कुणी
दावते भाव वेगळ्या नात्या
नित्यात जपतील आसक्ती
मापतील ना अंतरी शक्ती
श्वासात झुरते का मनही
हरते प्रीतीही तिची मुक्ती

