मेंदूची स्वच्छता
मेंदूची स्वच्छता
मेंदू शरीरातील सर्व अवयवांचे
करीत असतो योग्य ते नियंत्रण |
त्याच्याच आदेशानुसार चालते
शरीरातले सर्वच रक्ताभिसरण | |१| |
निरोगी शरीरासाठी मेंदूचे स्वास्थ्य
अबाधित ठेवायलाच हवं |
मेंदूची स्वच्छता रक्षणार्थ बुद्धीच्या
नवल त्यात कसलं ते नवं? | |२| |
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे
कारण त्यातच मेंदूचे रक्षण |
चिंता अविचारांची साफसफाई
सद्सद्विवेक बुद्धीचे खरे लक्षण | |
