गंध फुलांचा गेला सांगून
गंध फुलांचा गेला सांगून
तू ये ना असाच भवती
रिमझिमत घेऊन गाणी
तव शब्दसुरांची बाधा
मज वाटे मंजुळ वाणी
तव अबोल अधरावरती
मन व्याकुळलेले होते
अन तप्त कांचनी काया
विरहात वितळूनी जाते
तो पाऊस भिजवून जातो
डोळ्यातून झरते पाणी
उभी निश्चल नितळ धरेवर
पेरते नित्य विराणी
उगवते आस्था निस्वार्थ
घनगर्द तळाशी लढता
मी पुन्हा पुन्हा सावरते
खोल दरीत पडता पडता
निःसंग बहरुनी येतो
पुष्पाचे होते मोती
दवबिंदू ही मोहरतो
त्या अल्लड पानांवरती
मग पुष्प सुगंधी होते
अन् गंध फुलांचा गातो
तुझी नि माझी प्रीती
तो अवखळ वारा वाहतो

