गळफास
गळफास
उभे पिक शेतातले
दुष्काळात होरपळे
अश्रू शेतकरी बापाचे
डोळ्यातून खळखळे
हाता तोंडाचा घास
बरसतो अवकाळी
कोंब फुटे कनसाला
पिक आडवे रानोमाळी
कर्ज घ्यायचे शेतीसाठी
फेडायचे तरी ते कसे ?
मोडला तो कणा पाठीचा
सांगा उभे रहायचे कसे ?
दावणीच्या कासऱ्याचा
होतो मग गळफास
देह हेलकावे तो झाडा
शेत सारे भासे भकास
