STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

2  

Dilip Yashwant Jane

Tragedy

गजर

गजर

1 min
305

श्रावणात पावसाची

म्हणे लागायची झडी

आता कुणास ठाऊक

कोठे मारलीस दडी


नाही शेतातली माती

पावसानं रे भिजली

पेरलेलं बियाणंही

रित्या पोटीच निजली


होरपळे शिवारात

पिक कोवळे हे सारे

अंधारून येता नभ

दुर नेतात ते वारे


घालमेल या जीवाची

कधी उमजेल देव

तुझ्या लेकरांची आता

कधी येईल रे किव


कसा होईल रानात

पावसाचा रे गजर

बळीराजा आतुरला

नभी त्याचीच नजर


नाही थेंब पावसाचा

अश्रू नयनी जमले

वाट पाहत वर्षाची

रान अश्रूंनी भिजले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy