STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

गझल

गझल

1 min
289

चंद्र तारे वेचुनी मी भास भरला

सूर साधे गावया मी श्वास भरला।।


वादळाला छेडुनी मार्गात घेरा

अन् मनाचा रोखलेला ध्यास भरला।।


याच हृदयी आठवी तेव्हाच यादे

आवळत मी कळा आभास भरला।।


पाहिले चंद्रा तुला मी नयन लावुन 

चंद्रकोरीने कसा जो मास भरला।।


ही गुलाबाची नव्हे हे फुल सुगंधी

या फुलाचा स्फुंद चोही वास भरला।।


जीवनाला जिंकले मी रे कधीचे

क्षण सुखाचे झेलुनी तास भरला


मोठमोठ्या संकटांना भेटले मी

त्यास हृदयी ठेवुनी रास भरला।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational