गझल
गझल
माझा विचार तुम्हा पचणार आज नाही
खोटे कुभांड माझे रचणार आज नाही
माझा खिसा रिकामा प्रचंड काळजीने
फाटून नोट गेली वटणार आज नाही
हे पोचले नभाला अन्याय या घडीचे
आलेख वाढलेला घटणार आज नाही
आधार दोर होता मजबूत माणसांना
तो दोर काचलेला तटणार आज नाही
थापा अजून देती हे राजकारणी रे
साधा विकास होऊ शकणार आज नाही
पारा तुझा किती ही चढला तरी जमेना
संतोष मेळ सारा बसणार आज नाही
