STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

गझल

गझल

1 min
183

माया ममता आटत आहे आता

दिखाऊपणा मोहत आहे आता.


वाट कोणती बघून जाऊ येथे

अनोळखी ती वाटत आहे आता.


प्रेमी वेडे दिसती येथे सगळे

नाही त्यांना सोडत आहे आता.


फुलांस भवरा का आवडतो आहे

मधास त्याच्या चाखत आहे आता.


देवी चरणी फुले अर्पितो बघ मी

प्रेम भाव तो मागत आहे आता.


उगीच कोणी असे म्हणावे खोटे

खरे जगाला मोडत आहे आता.


शोभास किती सांगावे ते कोणी

नाही तिजला बोलत आहे आता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational