गिरणीचा धुर
गिरणीचा धुर
निळ्या निळ्या आकाशात
शुद्ध वातावरणात
गिरणीचा निघतो धूर
लावतो मनाला हुरहूर
धुरामुळे वाढले प्रदूषण
जंगले झाली वीरान
प्राणी झाले हैराण
वाढले रोगाचे प्रमाण
विषारी असा हा धूर
आहे आपल्यासाठी जणू असुर
आणखी कारखाने गाड्या वाढवून
होऊ नका पृथ्वी मातेवरच क्रूर
