गिरिजात्मज
गिरिजात्मज
गिरिजात्मज
उमेचा सुत
कृपा असावी
वंदितो सुत १
गण नायक
तुच प्रणव
आम्हां भक्तांचा
तु एक देव २
बुद्धी देवता
तुच निश्चिती
उपनिषदे
तुला नमिती ३
अर्पितो तुज
सुमनांजली
फुलावे हास्य
माझिया गाली ४
संकट वारी
माझे गणेशा
हीच ठेवितो
चरणी आशा ५
देवांचा देव
गणांचा ईश
भालचंद्र तु
भक्तांना वश ६
ठेवितो माथा
आलो शरण
व्याधींचे सर्व
करी हरण ७
