गीता जयंती
गीता जयंती
बावीस डिसेंबर 2023...!
गीता जयंती.....!
भग्वतगीता श्री कृष्णाची
बरेच काही आपणास देते
जीवन कसे जगावे हे
लीलया आपल्याला शिकवते..!
आज गीता जयंती
स्मरण करावे कृष्णाचे
शिष्य होऊनि अर्जुनासम
ज्ञान प्राशावे जन्माचे...!
कली युगे ज्ञानामृत जणू
गीतेने हो आपणा दिले
जे प्राशिता कृथार्थ होईल
जीवन जगणे हे आपले...!
नतमस्तक होऊनी आज आपण
वंदन करूया त्या परमात्म्याला
जीवन जगणे सुलभ व्हावे म्हणूनी
अंगीकारु पुन्हा एकदा अमृत गीतेला...!
अंतराची आस मिटेल
आचरता गीता धर्माला
प्राधान्य देऊ चला
पुन्हा एकदा निष्काम कर्माला....!
