Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishweshwar Kabade

Action

4.4  

Vishweshwar Kabade

Action

माणसा

माणसा

1 min
254


माणसा माणसा माणूस तू बन || धृ ||


का करतोस एखाद्याचा उगाच अपमान

स्वतःला समजूनी महान

इतराला समजूनी लहान

फक्त पाहिजे तुजलाच मान

माणसा माणसा माणूस तू बन || १ ||


किती बनशील तू स्वार्थी 

 उगाच पुजूनी पाषाण मूर्ती

नकोस विसरू प्रत्येक कर्माचा हिशोब वरती

नको करूस पापमय ही धरती

माणसा माणसा माणूस तू बन || २ ||


कुठेे गेली तुुुझी भारतीय संस्कृती

दाखवायलास तुझ्यातली विकृती

मरून गेली वाटतेे तुझी मती

म्हणूनी करायलास तू अति

माणसा माणसा माणूस तू बन || ३ ||


शिरली आता तुझ्यात राक्षसी प्रवृत्ती

आपोआप दूर झाली मानवी वृत्ती

नात्यांची दिली जाते तिलांजली

औपचारिकतेेसाठी उरली श्रद्धांजली

माणसा माणसा माणूस तू बन || ४ ||


ठेव थोडं परिस्थितीची जाण

नको हरवूस तू भान

नको होवूस उगाच बेभान

फक्त सांभाळ आपलं अतृप्त मन

माणसा माणसा माणूस तू बन || ५ ||


करशील तू व्यसन

गोरगरिबांना लुटून

मग असंच वाया जाईल हे धन

कारण ईश्वराला होत नाही ते सहन

माणसा माणसा माणूस तू बन || ६ ||


बोलून मधाळ

हाणतो तू गबाळ

नकोस दाखवूू सत्तेचा तू माज

नाही कुणीही अमर आज

माणसा माणसा माणूस तू बन || ७ ||


अधिक चांगलं वाग

अधिक चांगलं जग

बदल तुझा दृष्टिकोन

मग माणुसकीचं नक्कीच होईल जतन

माणसा माणसा माणूस तू बन || ८ ||



Rate this content
Log in