गीत पावसाचे
गीत पावसाचे
सुगंध पसरे
मातीचा सुवास
पहिला पाऊस
व एकांतवास
टपकती धारा
रिमझिम थेंब
काळोख रात्र
होऊन चिंब
खूप दिवसांनी
आलाय पाऊस
करी शांत आज
तप्त धरणीस
ढगात साठून
अमृत जीवन
मेघराजा करी
सर्वांना पावन
निसर्गाची कांती
उजळे सुंदर
जीवजंतू होई
आनंदविभोर
पावसाची कृपा
देई आशिर्वाद
शेतकरी खुश
देई धन्यवाद
