STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*घटनेचे शिल्पकार*

*घटनेचे शिल्पकार*

1 min
28.6K


१४ एप्रिल डाॅ. बाबासाहेब जन्मले

दलितांसाठी त्यांनी जीवन अर्पिले

ज्यांचा हवेपेक्षाही वेग जादा

केला अन्यायाविरूद्ध लढण्याचा इरादा..


तुम्ही देव नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हतात

तर बाबासाहेब तुम्ही माणूसकीचे पूजक होतात

आपण सांप्रदायिक,सदभावना ,जाणकार,भाष्यकार

प्रखर देशभक्त,लेखक, संपादक, झुंजार पत्रकार


आपण ज्ञानपुरुष,समताप्रेमी

आहात आपण निस्सीम ग्रंथप्रेमी

मोजू तरी कशाकशाची उंची,तुमच्या कर्तव्याची

तुम्ही जगाला शिकवलीत व्याख्या माणुसकीची


आपण कायदे पंडित भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेकर

आपण युगपुरुष भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,

राज्य घटनेचे शिल्पकार....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational