STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

3  

Monali Kirane

Tragedy

घरटं

घरटं

1 min
206

पाहात होते अचंब्याने चिमणीचे

चिकाटीने एकएक काडी जमविणं,

जीवाउप्पर कष्ट करून

घरकुल आपलं घडविणं!


सतत फेऱ्या मारून मारून

दाणा दाणा जमविणं,

निगुतीने पिल्लांना

हळूहळू भरविणं!


पंखात येता बळ एक दिवस

सगळी पिल्लं गेली उडून,

घरटे राहिले हिंदोळत अन्

एकएक काडी गेली पडून!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy