घरटे
घरटे


चिमणा-चिमणीचा संसार
नवीन जीवनात आली बहार
आनंदाला आता आला पुर
उमलले वेलीवरती अंकुर
नव्या पाहुण्याच्या स्वागताला
जोडपे जुटले कर्तव्याला
जोडपे लागले कमवायला
नवं घर तयार करायला
आकाशी लागली उडायला
घरच्याच आला पाहुणा
गोंडस सुंदर गोजिरवाणा
सांभाळण्याचा प्रश्न आला
आता बेबीसिटींग
त्याचा राहण्याचा ठिकाणा
आजी-आजोबा वृद्धाश्रमाला
कुलूप सदैव घराला
पैसा पुरत नाही संसाराला
वेळ देऊ शकत नाही एकमेकांना
चिमणा-चिमणी व्यस्त
कामात आपल्या आपल्या