घर
घर
घर तेच आहे...
लोकं ही तीचं आहे...
घर मात्र अनोळखी वाटतं आहे...
अस्त व्यस्त नाही...
पाच साडेपाच वर्षा पूर्वी सोडून गेलो तसंच आहे
आतील लोकं तीच आहेत...
आतील लोकं बदललीत की मी...
घर तेच आहे, पण...
लोकं ही तीच आहेत...
पण...
घर मात्र अनोळखी वाटत आहे...
आई-वडील म्हातारी झालीत...
मी व बहीण तरुण झालोत...
मी लग्नाचा झालो...
बहीण मात्र शिक्षण घेत होती...
मला वाटे, आई-वडील बदललेत...
अन् त्यांना वाटे मी...
घर तेच आहे...
लोकं ही तीच आहेत...
घर मात्र अनोळखी वाटतं...
घर तेच आहे...
लोकं ही तीच आहेत...
नकळत दरी वाढत गेली...
दरी कमी करायची इच्छा असूनही...
वेदनांचा त्रास, सगळ्यांना...
मात्र मला वाटे की दरी कमी करण्यासाठी...
पुढाकार मी का घ्यावा...
घर तेच आहे...
लोकं ही तीच आहेत...
घर मात्र अनोळखी वाटतं.
घर तेच आहे...
लोकं ही तीच आहेत...
त्यांना बदलता येत नाही...
मला त्यांचें विचार पटत नाही...
ह्यालाच काय म्हणतात?...
पिढीतील फरक...
घर तेच आहे...
लोकं ही तीच आहेत...
घर मात्र अनोळखी वाटतं...
अनोळखीच राहिलं!
