घोटाळे
घोटाळे
इकडे घोटाळे
तिकडे घोटाळे
सगळीकडेच फक्त परीक्षेचे घोटाळे
त्यात फक्त होतंय हुशार विद्यार्थ्यांचे वाटोळे
श्रीमंत पोरांना लागलेत
पैसे देऊन नोकरी करण्याचे डोहाळे
त्यात दलाल झाले मालामाल
खाऊनी वरचा माल
असेच निघून गेले साल
सरकारी नोकरी झाली श्रीमंतांची मक्तेदारी
कधी मिळेल गुणवत्तेला न्याय शासन दरबारी
भ्रष्ट अधिकारी पक्के लबाड
कमवतात कोट्यवधींचं घबाड
