गहन नभ निळे माथ्यावरती
गहन नभ निळे माथ्यावरती
लक्ष लक्ष चांदण्या नभोमंडली
पीत चंद्रमा खुले अंबरामधी
रास नक्षत्रांची सजली भवती
गहन नभ निळे माथ्यावरती
निरभ्र नभांगणी तेज शशीचे
शुभ्र तेज विखुरले गगनाते
अदभुत भासे मन्मन खुलते
वंदन मनोभावे सृष्टीदेवते
माळवदावरी पौर्णिमा खुलते
माझे मीपण अवचित गळते
निर्मितीस ब्रम्हांडाच्या नमते
अंतर्मनास अनामिक भावते
कधी न सरावी शरदपौर्णिमा
निरभ्र रहावे असेच नभांगण
दुग्धशर्करा केसर मधुमासी
नितळ निखळ निरभ्र मन्मन
