STORYMIRROR

Varsha Shidore

Tragedy

3  

Varsha Shidore

Tragedy

घात सुगीच्या घासाचा...

घात सुगीच्या घासाचा...

1 min
649


रान दिसती हिरवी 

सुगी हंगाम ऋतूचा...

सडा पिकांचा समोर 

बहरला आनंदाचा... ।।१||


फळ कष्टाचं पाहुनी 

प्रीत हर्षाचा फुलला...

आज मिटेल रे भूक 

अंती आवंढा गिळला... ।।२||


चोहीकडे रे पाखरं 

दारी घोंगाट करती...

गीत मधुर ऐकुनी 

मन उल्हसित होती... ।।३।।


मिळे पोटास भाकर 

होई घरास आधार...

नियतीचा रे आभारी 

स्वप्न पुढ्यात साकार... ।।४।।


वादळाच्या राक्षसाचा 

खोटा खेळ का कर्माचा...

घास क्षणात मिटला 

ध्यास धीराच्या देहाचा... ।।५।।


पाणी डोळ्यात दाटले 

घाव का आयुष्यावर...

ध्यानीमनी नाही घात 

स्वप्न पुन्हा आशेवर... ।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy