STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy Inspirational

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy Inspirational

घाई कशाला लग्नाची?

घाई कशाला लग्नाची?

1 min
219

बाबा का हो इतक्यात,

पायी बेडी ती लग्नाची?

झाली आत्ता अठराची,

घाई कशाला लग्नाची?


जुना काळ तो सरला,

लेक धन दुसर्‍याची!

जग चालले मंगळा;

नको चिंता भविष्याची!


उच्च आहे माझी स्वप्ने,

अंतराळी उडण्याची !

होता खगोल शास्त्रज्ञ;

गगनी झेपावण्याची!


झाले पास नुकतीच,

यत्ता अहो बारावीची!

झेपावता अंतराळी,

कीर्ती वाढेल कुळाची!


हात जोडून विनंती,

लेक तुमची लाडाची !

बाबा म्हणून सांगते,

घाई कशाला लग्नाची!


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Similar marathi poem from Abstract