STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

गेले ते दिन गेले

गेले ते दिन गेले

1 min
203

आजकालचे भाऊ-भाऊ

झाले आता पक्के हाडवैरी |

बालपणी हेच एकमेकांची 

खायचे उष्टावलेली चिंच-कैरी‌ | |१| |


आता त्या दोघांमधून साधा

विस्तवही नाही म्हणे जात |

हेच पूर्वी एकमेकांवाचून 

नव्हते मुळीच काही खात | |२| |


बोलणं तर दूरच साधं पहाणं

सुद्धा एकमेकांना झालंय दुर्मिळ |

पूर्वी एकमेकांच्या सुखासाठीच 

यांचाच तुटायचा जीव तीळ-तीळ | |३| |


बालपणी आई-बाबा दोघांनाही 

होते सारखेच जीव की प्राण |

आई-वडीलांंच्या शरीरात त्यांना

समजवायला नाही उरले त्राण | |४| |


बहिणीसाठी भाऊ नेत्रज्योती दोन

होता दोघांना तिचाही खूप लळा |

आता वाट पाहून थकते भावांची

टपकतात नेत्री आसवं घळघळा | |५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract