Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

BABAJI HULE

Abstract

3  

BABAJI HULE

Abstract

गैरसमज एक न सुटलेलं कोडं

गैरसमज एक न सुटलेलं कोडं

1 min
242


गैरसमज एक न सुटलेलं कोडं -समज कमी पडली कि निर्माण होतो तो म्हणजे गैरसमज 

योग्य समज करून घेण्यात आलेले अपयश म्हणजे गैरसमज  II

 

मनुष्याच्या मानसिकतेला इजा पोहचवतो तो म्हणजे गैरसमज 

नातेसंबंधात प्रभावशाली वितंडवाद निर्माण करण्याचे कौशल्य म्हणजे गैरसमज II

 

मना-मनामधील गुंतागुंत वाढविणारा घटक म्हणजे गैरसमज 

दोन व्यक्तीमधील भूमिका व दृष्टिकोन यांतील अनावलोकन म्हणजे गैरसमज II

 

शब्दांचा किंवा प्रसंगाचा काढलेला चुकीचा अर्थ म्हणजे गैरसमज 

दोन भिन्न विचारांतील नकारत्मकता वाढविणारा शब्द म्हणजे गैरसमज II

 

हेतू, सुसंवाद, कृती किंवा विचार यामधील संशय म्हणजे गैरसमज 

संवादातील शाब्दिकपणा किंवा देहबोली यातील विसंगती म्हणजे गैरसमज II

 

दोन व्यक्ती मधील विश्वास, आत्मीयता कमी करणारा शत्रू म्हणजे गैरसमज 

अपूर्ण संवाद किंवा संवाद शैलीचा अयोग्य वापर म्हणजे गैरसमज II

 

एकमेकांमधील सौख्य, सबुरी, आणि इच्छा याना ठेच पोहचवतो तो म्हणजे गैरसमज 

भिन्न वैचारिकता आणि विषयांचे अज्ञान यांतील तफावत म्हणजे गैरसमज II

 

समोरच्या व्यक्तीच्या हेतूंचा आणि शब्दांचा अयोग्य अर्थ काढणे म्हणजे गैरसमज 

एखाद्या व्यक्तीच्या प्रति पूर्व गृह दूषितपणा असणे म्हणजे गैरसमज  II

 

वैचारिक सांशकतेमुळे सुस्प्ष्टपणा नसणे म्हणजे गैरसमज 

समोरच्याच्या विचारांची आणि आपली जुळवाजुळव न होणे म्हणजे गैरसमज  II

 

विचारातील फरक आणि दृष्टिहीनता यातील अयोग्य पडताळा म्हणजे गैरसमज 

अहंपणा, नकारात्मकता किंवा सोयीप्रमाणे विचाराची मानसिकता म्हणजे गैरसमाज II

 

दृश्य आणि अदृश्य बाबीमधील भिंत म्हणजे गैरसमज 

स्वैराचार, किंवा विचारावर न राहिलेले नियंत्रण म्हणजे गैरसमज II

 

आवश्यकता आहे ते बदलेले दृष्टिकोन समजण्याचा 

गरज आहे ते आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा वेध घेण्याचा 

स्वतःचा बदलेला निसंकोच दृष्टिकोन समोरच्यांना पटविण्याचा 

आणि यातून नक्कीच प्रेरणा मिळेल एकमेकांतील गैरसमज दूर करण्याचा  III


Rate this content
Log in