गावाकडची माती
गावाकडची माती
गावाकडची माती हिरवी अशी मनाची पाती
आपुलकीने चौकशी मनाने जोडलेली नाती
ना छोटा ना मोठा नाही कसली चढाओढ
आपण आपला सूर भेटण्याची सदा ओढ
नसे ऐश्वर्य फार तरी पै पाहुणा आनंदी राहतो
अन् निरोप घेताना गावाकडे वळून पाहतो
विसरू म्हणता विसरता येत नसते हो सारे
श्वासात मातीचा गंध साक्षी आकाशीचे तारे
माणूस कीतीही मोठा झाला तरी मनी सय
आठवणींच्या पाऊलखुणा नाद मधूर लय
