गारवा
गारवा
झाली ग हिच चाहूल
हिवाळ्या याच ऋतूची
अंगा झोबतो गारवा
पडे थंडी कडाक्याची
उसाची ही लागवड
आज कांदा हा लावला
शेतीत पाणीच पाणी
पाणी आलंय पाटाला
शेती गहू हरबरा
पाटने वाहते पाणी
झुलक येते थंडीची
हुडहुडी भरे मनी
चार महिना हिवाळा
मधोमध येई धूर
वाहन चालवतांना
विन सांगे बघा समोर
