STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

3  

Dinesh Kamble

Romance

गारठ्यातली भेट

गारठ्यातली भेट

1 min
3.0K


पहाटचा गारवा होता

आणि सोबतीला ती होती...

बोचऱ्या थंडीत सुध्दा

ऊब त्या प्रेमाची कमी नव्हती...


तिने घट्ट होते गुंफलेले

नाजूक हात हातात माझ्या ...

दव होते ओथंबलेले

नाजूक ओठांवर तिच्या...


ती गारठलेली पहाट मग

हळुवारपणे वितळून गेली..

जेव्हा सोनेरी किरणे

अलवार आम्हांला स्पर्शूनी गेली..


गंधाळली होती हरेक कळी.

तिच्या गंधित स्पर्शाने...

फुलपाखरे नाचत होती

तिला पाहुनी हर्षाने...


तिच्या मंतरलेल्या त्या शब्दांत.

मी ही पुरता गुरफटून गेलो होतो...

हात सोडुनी ती परतीला निघाली.

तेव्हा मी ही शुध्दीत आलो होतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance