गानकोकिळा
गानकोकिळा
भारतरत्न सम्राज्ञी
सप्तसुरांची तुच मुर्ती
उधळण संगीताची
जगी गायनाची किर्ती
गीत संगीत कवने
स्तवंता तीच्या कंठातूनी
सुमधुर काव्य सुमने
सप्तसुरांची रागीनी
शुभ्र धवल वस्त्र परिधान
विचारसरणी उच्च महान
देवी शारदेय सरस्वती
कंठात विराजमान
पद्मभूषण पद्मविभूषण
मानकरी पुरस्कारांची
गानकोकिळा लतादिदि
कन्यारत्न भारतमातेची
देते सलामी देशास
गीत जवानाचे गावूनी
देशभक्ती रोमारोमात
ओसाडते स्वंरातूनी
गायनाने होऊन मंत्र मुग्ध
भान हारपले श्रोत्यांचे
ताल सुरांचा अमुल्य ठेवा
चाहते कित्येक लतादिचे
स्वरांना आदरांजली देऊनी
धरली मावळतीची वाट
गेली गीत अमर करूनी
उगवेल पून्हा नव्याने पहाट
