गाडीत आम्ही माणुस नसतो
गाडीत आम्ही माणुस नसतो
आम्ही फ़क्त प्लेटफोर्मवरच माणुस असतो गाडीत आम्ही
माणुस नसतो
माणुस नसतो
माणुस नसतो
गाड़ी प्लेटफोर्म वर येताच आम्ही मेंढा होतोगाडीत धड़क मारून घुसतो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
गाडीत शिरतात हाताचे शिंग करून आम्ही बैल होतो
आहे तेथेच उभा रहातो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
गाडीच्या दारात वळू आणि प्याजेस मध्ये जळू असतो
गाडीत कोणालाही येऊ न देण्याचा धंदा करीत आसतो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
गाडीत जागा दिसताच आम्ही खेकडा होतो
तिरकी चाल करून जागा पकडतो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
गाडीत एखाद्धाचा पाय लागताच आम्ही गाढव होतो
त्याला सणसणीत लाथ मारतो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
गाडीत एखादा शेळपट दिसताच आम्ही वाघ होतो
त्याच्यावर मिशा पिंजारून गुरगुरतो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
छोट्याश्या कराणावरून भांडताना आम्ही कुत्रा होतो
एकमेकावर भूंकत राहतो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
गाडीच्या पूर्ण प्रवासात आम्ही मेंढरे असतो
प्लेटफोर्म आला की घोळक्यानी उतरतो
गाडीत आम्ही माणुस नसतो माणुस नसतो माणुस नसतो
आम्ही फ़क्त प्लेटफोर्म वरच माणुस असतो