STORYMIRROR

Mahadeo Dhokale

Tragedy

4  

Mahadeo Dhokale

Tragedy

मोबाइल

मोबाइल

1 min
260

 काळ काही थांबत नाही म्हणूनच 

त्याचे प्रश्नही संपत नाहीत 

 चालतो त्याला़च प्रश्न असतात 

थांबला त्याला काही नाही 


काळ पुढे जातो तसे 

नवीन प्रश्न निर्माण होतात

 जुने तसेच राहिले तरी 

नवे प्रश्न सतत सतावतात 


काल मोबाईल आहे 

हे समस्येचे उत्तर होते 

आज मात्र मोबाईल हाच

आपणा पुढील प्रश्न आहे 


सर्वजन मोबाईल मध्ये  

 अती व्यस्त आहेत 

सेल्फी, गेम्समुळे

 तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत 


शेवटी हेही प्रश्न 

काळच सोडवणार आहे

कारण प्रत्येक प्रश्नांचा 

काळ हेच उत्तर आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy