STORYMIRROR

Mahadeo Dhokale

Tragedy

4  

Mahadeo Dhokale

Tragedy

ग्रामीण शेतकरी

ग्रामीण शेतकरी

1 min
196

सरकार बरीक गपगार हायं

जगायचं कसं कळतंच नाय


रानात काय पिकतंच नाय

मोप केलं काम गाळला घाम

बरकत काय होतंच नाय

सरकार बरीक गपगार हायं

जगायचं कसं कळतंच नाय


खात बेणं परवडत नाय

मजूर आपला गपगुमान हाय

काम नाही तरी मजुरी ध्याय

सरकार बरीक गपगार हायं

जगायचं कसं कळतंच नाय


बाजारात मालाला मोलच नाय

पिकलं मोप तर फेकून द्याय

रिकामा बारदाना घराकडं जाय

सरकार बरीक गपगार हायं

जगायचं कसं कळतंच नाय


बायकु पोरांना कापडं नाय

आमच्या पायात पायतान नाय

काटकुटं तुडवत जाय

हु की चु करायचं नाय

सरकार बरीक गपगार हायं

जगायचं कसं कळतंच नाय


पोरं-पोरीना शिकशाण नाय

पोरीचं लगीन करणार काय

रीनापायी सावकार दारात हाय

सरकार बरीक गपगार हायं

जगायचं कसं कळतंच नाय


मरावं वाटतं मरणार हाय

पोरा बाळाचं होणार काय

आमचं जगणं मरणच हाय

सरकार बरीक गपगार हायं

जगायचं कसं कळतंच नाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy