STORYMIRROR

Mahadeo Dhokale

Others

4  

Mahadeo Dhokale

Others

बाप माझा वेगळा

बाप माझा वेगळा

1 min
472

बाप असणं वेगळं 

आणि बाप बनणं वेगळं 

सगळेच बाप असतात

हे सोपं असतं 

पण बाप बनण्यासाठी

कर्तव्य पणाला लावावे लागतं


सर्वच बाप असतात 

पण बाप बनून

शेतकरी होणं एवढं सोपं नसतं कारण

त्याला धनधान्य गाईगुरे यांचाही बाप बनावं लागतं


शेतकरी बापाचं दु:ख़ 

एवढं मोठं असतं

की त्याला त्याने मायेने 

पिकवलेल्या धनधान्याला 

कवडीमोलाने विकावं लागतं


शेतकरी बापाचं दु:ख़ 

एवढं मोठं असतं

त्याला दुष्काळ पाणीटंचाईत 

गाईगुरांचे हाल उघड्या 

डोळ्यांनी पाहणं नशिबी असतं


शेतकरी बापाला

एवढ्यासाठीच सलाम 

तो हे सर्व सहन करून 

बाप बनलेला असतो

बाप बनलेला असतो


Rate this content
Log in