पाऊस पडतो
पाऊस पडतो
1 min
375
पाऊस पडतो पाऊस पडतो
पाऊस पडतो पाऊस पडतो
जमिनीवरही आणि तारावरही
पानावर आणि झाडावरही
पाऊस पडतो पाऊस पडतो
जमिनीवरचा पाऊस विरतो.
रस्त्यावरचा वहात रहातो
झाडावर तो जरा थांबतो
तारेवरचा थेंबावर उरतो.
त्या थेंबाचीच मग लोकल होते
एका पाठोपाठ धावत रहाते
एक दुसरीला टेकताच मग
आपले अस्तित्व विसरून जाते
पाऊस पडतो पाऊस पडतो
जमिनीवरही आणि तारावरही
