Father's day निमित्त --बाप
Father's day निमित्त --बाप
बाप म्हणजे भरभक्कम आधार
संकटात वाचवून नेई पैलपार
बाप म्हणजे अमाप शक्ती
सुख देण्या करे नाना युक्ती
बाप म्हणजे कडक शिस्त
संगोपन होते म्हणूनच मस्त
बाप म्हणजे कष्ट आणि कष्ट
मेहनतीने मुलांना करी धष्टपुष्ट
बाप म्हणजे आधारवड
आरामास नसे त्यास सवड
बाप म्हणजे सुरक्षित भिंत
प्रसंगात दाखवी हिम्मत
बाप आठवे मोठ्या संकटाला
विश्वासाने संकटे होतात बाजूला
बाप असे मायेचे छत्र
बनू बाबांचे सच्चे मित्र
