स्वरावरून सुवचनरूपी पद्य
स्वरावरून सुवचनरूपी पद्य
1 min
1.1K
अ- अहंकाराचा वारा न लागो मनास
आ- आनंदीत,प्रसन्न मन सदा राहो
इ- इष्ट कर्म घडो क्षणाक्षणास
ई- ईश्वराचा वरदहस्त कृपा साहो
उ-उदारता, दातृत्व गुण येवो
ऊ- ऊर्जा सळसळो नसानसात
ए-एकमेकां साह्य करावे
ऐ- ऐट, ताठा नसावा मनात
ओ- ओजस्वी वाणी मुखी असावी
औ-औदार्याचे तेज वदनी चमकावे
अं-अंधकारातून प्रकाशाकडे जावे
अः-अःहा गुण हे अंगी बाळगावे