STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

3  

Vrushali Khadye

Others

चित्रकाव्य

चित्रकाव्य

1 min
14.5K


इवलीशी नाजूक ही परी

जन्मली या गरीबाघरी

काबाडकष्ट असे नशिबी

पण पोरीची हिम्मत भारी

केसाच्या झाल्यात जटा

अंगभर वस्त्रही न लाभे

तेज मुखावर असे चमके

राजकन्या परी मुखडा शोभे

चाले ती तो-यात अशी

मोरनीची ऐटबाज चाल

पायी छनछन पैंजण वाजे

जणू नृत्यांगनेचा येई ताल

अनवाणी पोर एकटी

सोसे उन्हाच्या झळा

कमरेवर घेऊन घडा

येई मनी कळवळा

 


Rate this content
Log in