STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

3  

Vrushali Khadye

Others

गर्भ

गर्भ

1 min
14.8K


आईबाबा,तुम्ही ऐकताय का ?

या सुंदर जगात मला यायचयं!

पहिले पाऊल टाकताच जगी

देवाआधी तुम्हां वंदन करायचयं

आईबाबा,तुम्ही ऐकताय का ?

या सुंदर जगात मला यायचयं!

 तुमच्या वंशाची  बनून पणती

अहोरात्र तुमच्यासाठी जळायचयं

आईबाबा,तुम्ही ऐकताय का?

या सुंदर जगात मला यायचयं!

धुणीभांडी ,केरकचरा करून कामे

दिवसरात्र तुमच्यासाठी कष्टायचयं

आईबाबा,तुम्ही ऐकताय का ?

या सुंदर जगात मला यायचयं!

या शतकातील बनून शूर निर्भया

वासनांध  नरपशूंना  चिरडायचयं

आईबाबा,तुम्ही ऐकताय का ?

या सुंदर जगात मला यायचयं!

आधुनिक तंत्रज्ञानाचे घेऊन ज्ञान

शिकून सावित्रीची लेक बनायचयं

आईबाबा,तुम्ही ऐकताय का ?

या सुंदर जगात मला यायचयं!

मी तुझ्या पोटातील मुलीचा गर्भ

आई,मला खुडणार तर नाही ना!

आईबाबा, तुम्ही ऐकताय का?

या सुंदर जगात मला यायचयं!

 


Rate this content
Log in