STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

3  

Vrushali Khadye

Others

पाऊस

पाऊस

1 min
14.2K


 

अल्लड,अवखळ प्रियकर  

तसाच भासे मज पाऊस

आसुसलेल्या धरतीसंगे

शृंगारिक मीलनाची आस

सळसळते यौवन

फुले गर्भी प्रेमांकुर

मृदगंध  चराचरांत

सृष्टीचा पालटे नूर

चिंब चिंब करी तन-मन

रिमझिम रिमझिम बरसे

श्रावणात खेळे ऊनासंगे

नभी इंद्रधनू  मोहक दिसे

हिरवा शालू वसुधा नेसे

समृद्धी नसानसात येई

केकावली, मयूरनृत्याने

उदासीनता पळून जाई

गात्र गात्र शीतल करी

आणी वदनी मोहक हर्ष

नित्य तुझी रे वाट पाहीन

तुझ्याचमुळे सा-यांचा उत्कर्ष


Rate this content
Log in