एकटी
एकटी
एकटी पडते मी जेव्हा
तुझी खुप आठवण येते
कुशीत तुझ्या डोकं घालून
खूप खूप रडावे वाटते.....
नजर लावून बसते मी
वाटं तुझी पाहत राहते
प्रत्येक आभास तुझेच समजून
दारातुन सतत डोकावून पाहते.....
जाता येता प्रत्येक क्षणी
आठवण तुझीच सतवत राहते
दूर असुनही जवळंच आहेस
असे मनाला भास राहते......
लढता लढता जगाशी
मी ही कधी कमजोर पडते
अचानक तुझ्या नसण्याचा
मलाही खुपशी उणीव भासते.....
वाहत राहतात डोळ्यातुन धारा
पाणी सुध्दा आटुन जाते
आठवणीत तुझ्या एकदिवस
माझी ही पापणी मिटून जाते.....

