एकदा समुद्र म्हंटला.....
एकदा समुद्र म्हंटला.....
एकदा समुद्र म्हंटला थोडा
आराम करू असं म्हणून
येऊन बसला त्याच्या किनाऱ्यावर
गोव्याच्या किनाऱ्यावर ऐकलं होतं
त्याच्या किनाऱ्यावरच कित्येकदा
आज आपण स्वतःलाच
पाहुयात आपल्या किनाऱ्यावरून
म्हंटला जन्माला आल्यापासून देत आलोय
आज मागून बघूया एकदा.....
असं म्हणून पायाला लागलेलं तेल, बोटात अडकलेली प्लॅस्टिकची पिशवी सोडत, पूर्वी खारट आणि आता दुर्गंन्धयुक्त वासावर पटकन सुगंधित मोत्यांचा डिओ मारत बाहेर आला
सुरुवात कुठून करावी असा प्रश्न त्याला पडला
पण लगेच चित्कारला
सुर्यास्तापासून....
जनरली सूर्योदयापासून करावी असं म्हणतात
मग सूर्यास्त ही सुरुवातच असते की
सुंदर रात्रीचा दिवस होणारी
रोज असा पसरून पाहतो सूर्यास्त
आज समोरून बघुयात
मलाही तो लाल गोळा पटकन पाण्यात पडतो की काय
अशी पोटात गोळा येणारी फिलिंग अनुभवयचीय
क्षितिजाच्या तळाचा शेवट गाठताना
आणि तो जिथे झाल्यासारखा वाटतोय
तिथून पटकन खाली तर पडणार नाही ना
अशा थ्रीडी थ्रिलची कल्पना करायची आहे
अजून काय काय करायचंय बरं???
स्वतःच्याच पाण्यात खेळायचंय
आणि लाटांमध्ये पडून नाका तोंडात खारट पाणी जाऊ द्यायचं आहे.....
माणसं वाळूचे किल्ले करतात
तेही रचून पहायचं आहे
माझ्या अनेक सॉरी
कवींनी बनवलेल्या माझ्या अनेक
सो कॉल्ड प्रेयसींची नावं
एक एक करून वाळूत लिहायची आहेत
मग काय ते बरं
हा जमल्यास मी माणसांना रिटर्न गिफ्ट दिलेला
कचरा साफ करायचा आहे
माझ्या अनेक लाटांसोबत किनाऱ्याला फोटो काढायला सांगून
समुद्रलोकातल्या सोशल मीडियावर
फिलिंग वाळूदार विथ मिलियन्स लाटा
पीक कर्टसी किनारा असं पोस्ट करायचं आहे
हा परत जाण्याआधी बायकोने सांगितलेलं
शहाळ्याचं पाणी,भेळ, एक फुगा, आणि
मला घेऊन जायचं आहे....
लिस्ट हलकी मोठी आहे
पण पूर्ण करून परत जाणं
निसर्गाची गरज आहे......
