एकांत
एकांत
हळूवार वारा शरीराला
स्पर्श करत होता,,,
अचानक मनात गुदगुदी होत होती,,,
आकाशात मान वर करून पाहिलं,,,
काळ्याभोर आकाशात,,,
टीम टीम त्या चांदण्या,,,
चमकणारा चंद्रमा,,,
आकाशाचं सौंदर्य वाढवत होते,,
निर्मळतेचे प्रतीक चंद्रमा,,,
एकांतात असताना,,,
मनाला भिड्डेल असं काहीतरी घडलं,,,
एकांतात असताना आकाशातूूून
तारा तुटून धरतीवर आला,,,
तरीपण आकाशातील
सौंदर्य कमी झालं नाही,,,
एकांतात असताना,,,
चांदणी आणि चंद्रमाने,,,
एकट नाही सोडलं,,,,
मनाची सुंदरता पाहायाला मजबूर केलं,,,
एकांतात मी माझी मला भेटले,,,