STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Inspirational

3  

VINAYAK PATIL

Abstract Inspirational

एकांत माझा

एकांत माझा

1 min
215

माझा एकांत आणि मी 

असतो जगण्याच्या फेऱ्यात 

कधी गुरफटूनी पुस्तकात तर

कधी मनाच्या वादळी भोवर्‍यात 


दुनियेचा गदारोळ पाहता 

काहीही नको वाटे 

शांततेची लहर येता 

मज एकांत बरा वाटे 


येथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे 

मुखवटे असतात वेगळे 

ते उचलून पाहताच 

दिसते काही जगावेगळे 


दुनियादारीच्या या जगात 

नसे कुणी कुणाचा 

प्रारंभ आणि शेवट असे 

सुखी मार्ग जीवन जगण्याचा 


जगण्याच्या या प्रवासात 

मार्ग निवड तुझा 

खडतर या वाटेवरी 

मज आवडे एकांत माझा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract