Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Fantasy

2  

Abasaheb Mhaske

Fantasy

एक उनाड दिवस

एक उनाड दिवस

1 min
2.2K


चल रे मना ! रिवाज सारे मोडू 

सुख -दुःख विसरू सारे, बाजूला ठेवू ..

झालेल्या चुका थोड्या -थोड्या आठवू 

निसटलेले क्षण पुन्हा नव्याने अनुभवू ...

चल रे मना ! थोडंसं आपण आता लहानगं होऊ 

जीवनाचा आंनद घेऊ लहानात - लहान होऊ ...

करू मनासारखं .सारं काही.. झोपाळ्यात बसू 

रान - वनात हुंदडू , फुलपाखराशी खेळू ...

चल रे मना ! मोठेपणाची लक्तरं क्षणभर फेकून  

एक उनाड दिवस असाच ...जगू सारं झोकून...   

हरिणाच्या पाठी धावू , तिचे पिलं पाहू  

वर्तमानात डोकावून जगन हरवलेल पुन्हा तिथं शोधू ...

चल रे मना ! विचार कसला करतोस, होऊ थोडं अनोळखी  

जाऊया कुठेहि तू नेशील तिकडे, आजचा दिवस तुझा गडे ! 

वाट्टेल तसं करू ,नाचू कुठे कसेही , ऊस ओढून खाऊ ...

चूक भूल माफ तुला ,,तू म्हणशील तसं एक उनाड दिवस तुलाच देऊ ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy