STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

एक तरी झाड लाव

एक तरी झाड लाव

1 min
527


तुला मी सांगतो मित्रा उघड डोळे जरा आता।

उन्हापासून लपवावा कसा हा चेहरा आता।।


झळा सोसूनही देतो तुला जो सावली शीतल।

असो हृदयात प्रेमाचा तया साठी झरा आता।।


सुखा मागून दुःखाची असे वारीच ठरलेली।

रहावे त्यातही निश्चल स्वतःला सावरा आता।।


सखीला बोलवावे पण नसावी का तिथे छाया।

तिच्या साठी असावा ना तरूचा आसरा आता।।


स्वहस्ते छानसे, सुंदर तरू परसात लावावे।

सुखाचा मंत्र हा सोपा सदा ध्यानी धरा आता।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational