STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

एक पणती एक वात

एक पणती एक वात

1 min
594

एक पणती एक वात

दिव्यासंगे सजली

तिमिराचे सावट सारूनी

 रात्र प्रकाशात रूजली

    दशदिशाही प्रकाशाने 

    न्हाऊन निघाल्या

    उमेदीच्या किरणांची

   बरसात करून गेल्या

अंधारात वाट दावी

एक मिणमिणता दिवा

उमेदिच्या किरणांची

आस लावे जीवा

   उजळून निघाल्या भावना

   उजळून निघाली मने

   मनामनाच्या सात्विकतेची

   उधळूनी दिव्य सुमने

मूर्ती तिची लहान

दिसे छोटीशी पणती

जळूनी स्वतः वातरूपाने

तिच्या प्रकाशाची नसे गणती

   एक आशेचा दिवा

  असा काही झगमगला

  अनेक दिवे संगे घेऊन

   तिमिरातही न डगमगला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational