एक पान गहाळ झालेले
एक पान गहाळ झालेले
हृदय आज माझे, सुनसान माळ आहे
माझीच ही धरा, हे माझे अंतराळ आहे
सांभाळले एक पुष्प, मी मला भावलेले
प्रेम केले हा मजवर, खोटाच आळ आहे
वाटते तुम्हा जरी ही, प्रीत अमृताची
मला जाळतो अंतरी, हा तोच जाळ आहे
किती पावले अजून, टाकू क्षितिजाकडे मी
कुठे खरोखरी सांगा, वाकले आभाळ आहे
सार्या कथेत माझ्या, तू न भेटसी मला
की कोणते पान, झाले गहाळ आहे
