एक माझी आई
एक माझी आई
एक माझी आई
तू भासे ठाई ठाई
मायेची उबदार अशी
मऊ मऊ रजाई
पहाट होता तुझी
सुरू होते घाई
अंगणात सडारांगोळीची
सजावट होई
रोज रोज पदार्थांची
रेलचेल बाई
खाता खाता सारे
तिचे गुणगान गाई
प्रत्येकाची आवड
जाणून ती घेई
न मागता अवचित
पुढ्यात ती देई
हौस मौज करताना
तिची नाही कुचराई
समजुतीने सारे ती
सांभाळून घेई
सासरवाशीण लेक जरी
आठवण तुझी येई
हळव्या कठीण क्षणी
समोर दिसे तू आई
