देव
देव
दगडाचा देव माझा तू
दगडासारंखाच राहीलास ,
काय हाल झाले जीवनाचे
खेळ हा का ? मांडिलास .
तुझ्या नामाचा जप
जपतो मी दिन रात ,
काय करू अता सांग तू
नेहमीच आलास तू मज दुःख देतं
मला ही अता तो पुरोगामी
विचार खरा वाटू लागल आहे ,
पण तुझं अस्तित्व नाकारण्यास
मनासी सतत वाद लागला आहें .
काय रे तू कुठं कुणा पावतो '
तुझ्या नामाचा जप करन्यात
मी माझा अखा दिन लावतो .
तुझ्या ते नियम पाळले मी सतत
खोटं कधी बोललो नाही ,
अनं सत्य कधी सोडलं नाही .
पण काय मिळालर नशिबी
फक्त वनवास आनी वनवास ॥
दगडाचा देवा माझा तू
दगडा सारंखाच राहिलास ,
काय हाल झाले जीवनाचे
खेळ हा का ? मांडिलास .
