STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

एक झाड लावू

एक झाड लावू

1 min
297

एक झाड लावू आपण

त्याला घालूया पाणी

पहाट समयी ऐकू येईल

पक्ष्यांची मंजूळ गाणी....!!


फळे, फुले भरपूर देतील

शुद्ध मोकळी हवा देईल

उन्हाच्या तप्त झळापासून

पशु पक्ष्यांचे रक्षण करील...!!


औषधी गुणधर्म त्यांचे

मानवाला तारील

वृक्षतोड केलीस तर

मानवाला मारील.....!!


वृक्षतोड थांबवू या

वनसंवर्धन करू या

वनस्पतीचे महत्व ओळखून

वृक्षलागवड सारे करू या....!!


पुस्तक, डिंक, औषधी

प्राणवायू झाडे देती

नाही कुठला स्वार्थ

फक्त द्यायचेच त्याला माहिती...!!


वसुंधरचे करण्या जतन

झाडे थांबवतील जमिनीची धूप

ओसाड, उजाड माळरानावरचे

आपसूक बदलून जाईल रूप....!!


एकमेकांना भेट देऊ झाडे

वृक्ष लागवड करू या

वृक्षवल्ली आमचे सोयरे

एवढे ध्यानी धरू या.....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational