Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

एक हरवलेली रात्र

एक हरवलेली रात्र

3 mins
321


सकाळी रोजच्यासारखी उठली पण रोजच्यासारखा मन प्रसन्न नव्हत. लग्न होऊन जवळजवळ दहा वर्षे झाली लग्न झालं तेव्हा राजश्री ही खूप सुखात होती नवऱ्याच तिला अमाप प्रेम मिळाले होते. सासू प्रतिकच्या लहानपणीच गेली. त्या घरात प्रतीकच्या लग्नाअगोदर प्रतिकच्टा वडिलांनीच त्याला मोठा केला.

    कॉलेजात असताना प्रतीक मला भेटला आणि आमचा प्रेमविवाह झाला. सुरुवातीचे दिवस खुप सुखात गेले लग्नानंतर फिरायला गेलो. खूप आनंदात होतो. आम्ही दोघं फिरून येताना येताना पाऊस पडत होता. गाडी समोरचे काही दिसत नव्हते. अचानक एक पांढरी साडी घातलेली बाई समोर आली प्रतीकने गाडीचा ब्रेक जोरदार दाबला. गाडी थांबली. गाडी चा बॅलन्स केल्यामुळे गाडी झाडावर आदळली. प्रतिकचा तोल गेला आणि त्या अपघातात प्रातिकचा मृत्यू झाला. राजश्री बेशुद्ध झाली तिला जवळच्या दवाखान्यात ऍडमिट केले. प्रतिकचे वडील आले आणि राजेश्री ला घरी नेले. ती रात्र राजश्रीसाठी खूप भयाण होती. दिवसा मागून दिवस गेले. राजश्री हळूहळू विसरायला लागली.

आता राजश्री हिने स्वतःला पूर्णपणे सावरले प्रतिक पासून राजश्रीला एक सुंदर कन्यारत्न झाली सायली. सायली दिसायला खुप सुन्दर होती. हळू हळू सायली मोठी होत होती तशी राजश्री हिला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली.

    त्या दिवशी सायली घरी आली घरी कोणी नव्हते. ती एकटीच होती. पण ती आता समजूतदार होती. तिला आईने सांगीतले होते पुढे आयुष्यात कशीही वेळ येऊ शकते. संकटांना सामना कसा करायचा हे सगळे तिला सगळे समजावून सांगितले होते. घरात आल्यावर तिने घराचे दार खिडक्या बंद केल्या. आईला फोन केला फोन लागत नव्हता. सायलीच्या छातीची धडधड वाढू लागली. एवढ्यात दारावरची बेल वाजली सायली खूप घाबरली पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि दारावरच्या भिंगातून बाहेर पाहिलं तर दोन मुले तिला दिसले. तिने आतून आवाज दिला तर ते म्हणाले की आम्ही कुरियर वाले आहोत. तिने आईला फोन लावायचा प्रयत्न केला.फोन लागला नाही. ती आता घाबरू लागली. पण वेळ न घालवता पोलीस स्टेशन ला कॉल केला. ती मुलं काही ऐकत नव्हती. त्या मुलांच्या लक्षात आलं की ही मुलगी एकटीच आहे. एका भयाण जंगलातल्या शेळीची जशी अवस्था असते तशी अवस्था सायलीची झाली. भुकेलेल्या अवस्थेतल्या हे जखडलेले पुरुष तिच्यावर झडप घ्यायला आसुसलेले . तिची धडधड वाढू लागली. शेवटी कंटाळून खिडकीतून उडी मारू हा विचार करून ती खिडकीतून आत आली.. आपल्या खोलीत दार बंद करून बसली तिने तोंडावर हात मारून रडत बसली. घाबरलेली ती. आपला आता काय होणार या विचाराने ते भयभीत झाली. त्या मुलांनी दरवाजा तोडतच तिच्यावर झडप घालणार तेवढ्यात पोलिसांचा ताफा तिथे आला आणि तिला त्या मुलांच्या तावडीतून सोडवले. 

 इकडे राजश्री घरी यायला निघाली तीच सगळं लक्ष सायली होत. रस्त्याने येताना तीची पर्स चोरी झाली होती. त्यामुळे ती काहीच करु शकत नव्हती. तिला काय करावं काही सुचत नव्हत. एक गणपतीचे मंदिर लागल. तिच्या डोळ्यातला पाणी काही थांबत नव्हतं गणपतीजवळ सगळं मनातलं सांगितलं. तिथून निघतच तिच्या ओळखीचे जोशी काका भेटले. काकांनी विचारतच तिने सगळं काकांना सांगितलं. काकांनी तिला घरी आणताच घरी पोलीस तिला दिसतात राजश्री खूप घाबरली पोलिसांनी तिला झाला प्रकार सांगितला. सायलीला जबर धक्का बसल्यामुळे तिची बोलती बंद झाली. दिवस निघून गेला रात्र आली आणि त्या रात्री तिला तिच्या आयुष्यातील ती भयाण रात्र आठवली. त्या रात्री तिला प्रतीकची खुप आठवण येत होती. तिला वाटलं आज जर प्रतीक जिवंत असता तर हा प्रकार आज आपल्यावर ओढला नसता. तो आपल्याला टाळता आला असता.

तेव्हापासून राज्यश्री ने ठरवलं की आता सायलीच आपलं आयुष्य. आता तिच्यासाठी जगायचं.

  या सगळ्यांवर एक लक्षात येतं ही असंगाशी संग पण वेळ आली तर प्राणाशी गाठ पण बांधावी लागते.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy