एक होती चिमणी...
एक होती चिमणी...
(चिऊताईला जागतिक चिमणी दिनाच्या खूप शुभेच्छा...)
प्रश्न मुलांना पडलेला..
कोण गं ही चिमणी... दिसते तरी कशी...
आजची मुले आई बाबांना विचारी...
तिचा रंग कसा, काय तिची बोली....
आठवते ती आजीने सांगितलेली चिऊकाऊची स्टोरी
मला पण दाखव ना आई ती चिमणी...
असेल ना पक्षीसंग्रहालयात ठेवलेली ती...
मुलांनी मारूनी सर्च गुगलमधून काढली सर्व माहिती..
अपलोड करुन स्टेटसमध्ये ठेवती,
आज "जागतिक चिमणी दिन" असे लिहिती...
